परीक्षा घोटाळ्यामध्ये सरकार दलालांना पाठिशी घालतंय – दरेकर
आरोग्य पदाची भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही तिला पात्र ठरवून परीक्षेचे काम कसे काय देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई: आरोग्य पदाची भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये असतानाही तिला पात्र ठरवून परीक्षेचे काम कसे काय देण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकार परीक्षा भरती प्रकरणामध्ये दलालांना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोपीही त्यांनी केला. परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून, त्याचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.