Video | कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या : प्रविण दरेकर

| Updated on: Jul 21, 2021 | 8:21 PM

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी दिली पाहिजे, असे दरेकर म्हणाले.

मुंबई : “कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी,” अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

रेल्वेप्रवासाची परवानगी देऊन सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा 

“कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच काळापासून रेल्वेप्रवास करु दिला जात नाहीये. त्यांना प्रवासादरम्यान बराच वेळ प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच प्रवासादरम्यानचा हा खर्चही न परवडणारा आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी दिली पाहिजे. कोविडच्या संकटकाळात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यायला हवा,” असे दरेकर म्हणाले.

 

Breaking | मविआ सरकार स्थापनेवेळी 5 अधिकारी इस्त्रायलच्या दौऱ्यावर, काँग्रेसचा फडणवीसांना सवाल
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 : 30 PM | 21 July 2021 लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?