शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या बदलली – प्रवीण दरेकर

| Updated on: Mar 20, 2022 | 1:55 PM

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी एमआयएमला (mim) महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत जे बोलत आहेत. तो त्यांचा बदललेला हिंदुत्वादी विचार आहे. त्यांना सत्य पचनी पडत नाही. शिवसेना […]

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी एमआयएमला (mim) महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत जे बोलत आहेत. तो त्यांचा बदललेला हिंदुत्वादी विचार आहे. त्यांना सत्य पचनी पडत नाही. शिवसेना हतबल झाली आहे. त्यांचे हिदुत्वाबद्दलची विधाने गांभीर्याने घेऊ नयेत. शिवसेनेला संगतीचा परिणाम झालेला दिसतोय. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हाताची घडी घालून उभे राहतात आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका मांडतात… यातच सगळं आलं…, असं सूचक विधान करत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 370 कलम हटवल्याने स्वप्नातला काश्मीर पुन्हा बहाल झाला आहे. तो राऊतांनी पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 March 2022