Uddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का?, प्रवीण दरेकर यांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली तर मग 2 वर्षाच्या सत्तेत शिवसेनेला काय मिळालं? असा सवाल दरेकर यांनी शिवसेनेला विचारलाय.
‘मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.