Mumbai Sion Rain | साचलेल्या पाण्यात उतरून प्रवीण दरेकरांकडून सायन सर्कल भागाची पाहणी
सर्व परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांंनी स्वत: रस्त्यावर उतरुन सायन सर्कल परिसराची पाहणी केली.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. येथे आज मुंबईत ठिकठिकाणी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले होते. या सर्व परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांंनी स्वत: रस्त्यावर उतरुन सायन सर्कल परिसराची पाहणी केली.