Mumbai Bank बोगस मजूर प्रकरण; Pravin Darekar मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. प्रविण दरेकर यांच्या विरोधात आपचे धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर दरेकर यांनी पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं होतं. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.