VIDEO : Pravin Darekar | अनिल देशमुख प्रकरणी, कर नसेल तर डर कशाला – प्रवीण दरेकर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. यासर्व प्रकरणावर आता प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचे म्हणणे आहे की, कर नसेल तर डर कशाला पाहिजे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.