Mumbai Padmini Taxi : मुंबईची शान अन् 6 दशकांपासून मुंबईकरांची सेवा करणारी ‘पद्मिनी’ इतिहासजमा होणार

| Updated on: Oct 30, 2023 | 12:33 PM

VIDEO | डबल डेकर विनावातानुकुलीत बेस्ट बस नंतर मुंबईतील प्रीमिअर पद्मिनी टॅक्सी इतिहासजमा होणार आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार २० वर्षांपेक्षा जुनी असलेली काळी-पिवळी टॅक्सी चालवण्यास परवानगी नाही. त्यामुळे आजपासून पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही.

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | डबल डेकर विनावातानुकुलीत बेस्ट बस नंतर मुंबईतील प्रीमिअर पद्मिनी काळी पिवळी टॅक्सी इतिहासजमा होणार आहे. ६ दशकांपासून मुंबईकरांची सेवा करणारी ही पद्मिनी टॅक्सी आता रस्त्यावर धावताना दिसणार नाहीये. मुंबईची शान अशी ओळख असलेली आणि गेल्या सहा दशकांपासून रस्त्यांवर धावणारी काळी-पिवळी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी इतिहासजमा होणार आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार २० वर्षांपेक्षा जुनी असलेली काळी-पिवळी टॅक्सी मुंबईत चालवण्यास परवानगी नाही. त्यामुळे आजपासून काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. शेवटच्या टॅक्सीचे मालक अब्दुल कारसेकर यांच्या अनेक आठवणी या टॅक्सीसोबत आहेत. अनेक कलाकारांनी या टॅक्सीचा वापर हा शूटिंगसाठी केला असून या टॅक्सीचे जतन व्हावे यासाठी संघटनेने पत्र परिवहन विभागाला दिलेलं आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल कारसेकर यांनी दिली आहे.

Published on: Oct 30, 2023 12:22 PM
MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत न्यायालय काय निर्णय घेणार? नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करणार?
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी, ‘त्या’ मराठ्यांनाच मिळणार कुणबी प्रमाणपत्र, मुख्यमंत्री काय म्हणाले?