वज्रमूठ सभेच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त, बघा कशी आहे सुरक्षा?

| Updated on: Apr 16, 2023 | 2:51 PM

VIDEO | नागपुरात काहीच वेळात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, सभास्थळी बड्या नेत्यांची हजेरी, कडक पोलीस बंदोबस्त

नागपूर :हाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नागपूर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आज नागपूर शहरात महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागण्यास सुरूवात झाली आहे. सभेसाठी 500 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्तदेखील राहणार आहे. तर 100 पोलीस अधिकारी देखील पोलीस बंदोबस्तमध्ये तैनात असणार आहे.

Published on: Apr 16, 2023 02:51 PM
राऊत यांच्यामध्ये संस्कारांची कमी; शिवसेना नेत्याची राऊत यांच्यावर जहरी टीका
एका बॅनरमुळे महाविकास आघाडीत होणार बिघाडी? बॅनरवर नक्की लिहिलंय तरी काय?