Rain Update | राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने पुढील तीन तासात नांदेड, परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस आणि वीज देखील कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे. गडचिरोलीमध्येही पहाटेच्या सुमारास पाऊस झाला.