मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : नेहमी वादग्रस्त विधानं करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या दरबारात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली तर विरोधकांनी या भेटीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. बागेश्वर बाबांनी या आधी जी विधानं केली ती याआधी तपासून घ्यावीत, असा सल्ला विरोधकांनी दिलाय. महिला, देव, संत, धर्म याबाबत केलेली विधानं वादग्रस्त राहिली आहे. आता अजित पवार यांचा गट आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत. गेल्या दसऱ्याला राम पूजनीय आहेत. पण रावण दहनावर बंदी आणा, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतली. यावर तुषार भोसले यांनी रावणाचं गुणगान थांबवावं असा इशारा दिलाय. तर आता बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचं आयोजन भाजप समर्थकांकडून केले जातंय. पण यापूर्वी स्वतः बागेश्वर बाबांनी रावण गुणी असल्याचे असल्याचे म्हटलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट