राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ
राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांनी भूरळ घातली आहे. त्यांनी मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (samudra phal trees) हे झाड चांगलेच आवडले आहे.
राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांनी भूरळ घातली आहे. त्यांनी मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (samudra phal trees) हे झाड चांगलेच आवडले आहे. या परिसरातून जात असताना कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या नजरेस हे झाड पडले होते. त्यानंतर आता थेट राष्ट्रपतीभवनातून या झाडाबद्दलची माहिती विचारण्यात आली आहे. मुंबई कोस्टल रोड (Mumbai Costal Road) परिरस तसेच वरळी सी फेस परिसरात ही झाडे लावण्यात आलेली आहेत. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात आले आहे.