मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा करणार? बघा संभाव्य यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या उमेदवारांशी चर्चा करून त्यांचे रूसवे फुगवे दूर केल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी ते बाळासाहेब भवन येथे दाखल होणार असून ते पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार
शिंदे गटाची संभाव्य यादी समोर आली असून रामटेक येथून राजू पारवे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, यवतमाळ येथून भावना गवळी, हिंगोली येथून हेमंत पाटील यांना उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. यासह कोल्हापूर येथून संजय मंडलिक, हातकणंगले येथून धैर्यशील माने, नाशिक येथून हेमंत गोडसे आणि मावळ येथून श्रीरंग बारणे हे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या उमेदवारांशी चर्चा करून त्यांचे रूसवे फुगवे दूर केल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी ते बाळासाहेब भवन येथे दाखल होणार असून ते पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेचे उमेदवार देखील घोषित करण्याची शक्यता आहे.