दबावतंत्र हे माझ्या स्वभावात नाही- संजय शिरसाट
त्या पोस्टचं समर्थन करणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत आहे. हे दबाव तंत्र नाही. मी काही तरी करेल हे दाखवणं हे स्वभावात नाही. मी परत माघारी जातोय असा त्याचा अर्थ नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
औरंगाबाद: मंत्रिमंडळाचा विस्तार होताच शिंदे गटातील खदखद बाहेर येऊ लागली आहे. मंत्रिपदासाठीची ही खदखद आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या माध्यमातून ही खदखद समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, असं ट्विट काल संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यामुळे संजय शिरसाट हे शिंदे गटात (Shinde Group) नाराज असून दबाव तंत्राचा वापर करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. आता यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटची जोरदार चर्चा सुरु झाल्यावर शिरसाट यांनी हे ट्विट डिलीट केलं. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. मागची पोस्ट कशी फॉरवर्ड झाली माहीत नाही. त्या पोस्टचं समर्थन करणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत आहे. हे दबाव तंत्र नाही. मी काही तरी करेल हे दाखवणं हे स्वभावात नाही. मी परत माघारी जातोय असा त्याचा अर्थ नाही, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.