पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बूस्टर डोसची घोषणा, राजेश टोपेंकडून निर्णयाचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यानंतर फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू होता.
मुंबई : ओमिक्रॉनच्या धास्तीने जगाबरोबर देशाची आणि राज्याची चिंता वाढवली आहे, त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी मजबूत करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा भर आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यानंतर फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू होता, तशी मागणी आदित्य ठाकरे यांनीही पत्र लिहून केली होती. शनिवारी मोदींनी देशाला संबोधीत करत असताना याबाबत घोषणा केली आहे.