PM Modi TV9 Interview : मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय? पंतप्रधानांकडून येत्या नव्या समीकरणाचे संकेत?

| Updated on: May 03, 2024 | 10:35 AM

Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : उद्धव ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल, असं वक्तव्य मोदींनी केलंय. उद्धव ठाकरेंसाठी पंतप्रधान मोदींनी खिडकी उघडी केली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल मैत्रीपूर्ण आणि सहानुभूतीपूर्वक शब्द वापरलेत. बघा काय म्हणाले?

टीव्ही ९ नेटवर्कच्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंबद्दल जे बोलले त्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल, असं वक्तव्य मोदींनी केलंय. उद्धव ठाकरेंसाठी पंतप्रधान मोदींनी खिडकी उघडी केली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ठाकरेंवर बोलताना मोदी म्हणाले, बायोलॉजिकली उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून, असे मोदींनी सांगितले. राज्याचा विचार केला तर भाजपचे ठाकरेंच्या शिवसेनेसोबतचे संबंध ताणले गेलेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सभांमधून कोल्डवॉर सुरू असल्याचं दिसतंय, अशातच मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल मैत्रीपूर्ण आणि सहानुभूतीपूर्वक शब्द वापरलेत. बघा काय म्हणाले?

Published on: May 03, 2024 10:33 AM
PM Modi TV9 Interview : ठाकरे शत्रू नाहीत, TV9 च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
पक्षप्रवेशाविनाच एकनाथ खडसे भाजप कार्यालयात आले अन्…; सर्वांच्या भुवया उंचावल्या