ही गोष्ट तुमच्या तोंडून शोभते का?, शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर

| Updated on: May 03, 2024 | 11:59 AM

या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवाल मोदींनी करत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर साधलेल्या निशाण्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्वीट करून मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. बघा काय केलं ट्वीट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर साधलेल्या निशाण्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्वीट करून मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं, ‘मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे. पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवारांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं. असो! पण मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो. याचा एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे’, असं रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवाल मोदींनी करत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता.

Published on: May 03, 2024 11:59 AM
पक्षप्रवेशाविनाच एकनाथ खडसे भाजप कार्यालयात आले अन्…; सर्वांच्या भुवया उंचावल्या
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम, आंबेडकरांच्या टीकेवरून मोदींनी फटकारलं; म्हणाले… तर तेव्हाच केलं असतं