PM Modi Interview : देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी? पंतप्रधान स्पष्टच म्हणाले…
Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : सर्वच राजकीय नेते आपल्या आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार करताना दिसताय पण सध्या जनतेसमोर मोदींची गॅरंटी आहे तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर एका झटक्यात गरीबी दूर करू, अशी राहुल गांधीही गॅरंटी देत आहे. देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या मोदींची गॅरंटी… चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच राजकीय नेते आपल्या आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार करताना दिसताय पण सध्या जनतेसमोर मोदींची गॅरंटी आहे तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर एका झटक्यात गरीबी दूर करू, अशी राहुल गांधीही गॅरंटी देत आहे. देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? असा सवाल मोदींना केला असता ते म्हणाले, गॅरंटी शब्दावर माझा कॉपीराईट नाही. गॅरंटी अशी मिळत नाही. मोठ्या तपश्चर्येनंतर तुमचे शब्द गॅरंटी बनतात. तुमच्या शब्दाला किंमत मिळते. माझा प्रत्येक शब्द एक जबाबदारी आहे. माझा प्रत्येक शब्द हा एक गॅरंटी आहे. त्या रुपात मी करतो. बाकी लोक तो शब्द वापरत आहेत, त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण मला सांगा, त्यांचे आजोबा, पणजोबा त्यांचे भाषण ऐका. ते गरीबीवर बोलायचे, त्यांची आजी गरीबीवर बोलायची. त्यांचे वडील गरिबीवर बोलायचे. त्यांची आई जेव्हा रिमोट सरकार चालवायची तेव्हाही गरीबीच्या गोष्टी करत होत्या. आता बोलत आहेत आम्ही एका झटक्यात गरीबी दूर करू. आम्ही फटाफट गरीबी दूर करू. कोण विश्वास ठेवणार? असा सवालही मोदींनी केला आहे.