Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवण आटोपलं
लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान मोदी सफाई कामगारांसोबत बसून जेवण करताना दिसून आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी काशी विश्वधाम कॉरिडोअरचं लोकार्पण केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक निराळे रुप पहायला मिळाले. लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान मोदी सफाई कामगारांसोबत बसून जेवण करताना दिसून आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दिसून आले. त्यानीही सफाई कामगारांसमोबत बसून भोजन केले. यावेळी जवळपास 2500 कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या आवडीचे गुजराती भोजनही बनवण्यात आले होते.