पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव महत्त्वाचा दौरा, जंगी स्वागत अन् बघा रोड शोची एक झलक
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगावात मोठा दौरा, राणी चन्नमा चौकातून निघाला रोड शो
कर्नाटक : कर्नाटक राज्यातील बेळगावमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकातील ज्या भागात सर्वाधिक मराठी भाषिक आहेत, त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा रोड शो सुरू आहे. कर्नाटक भाजपतर्फे मोदींच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. बेळगावातील राणी चन्नम्मा चौकातून पंतप्रधान मोदी यांचा दिमाखदार रोड शो निघाला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी उसळली. मोदींनीही गाडीतून बाहेर हात दाखवत नागरिकांना अभिवादन केल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेळगाव येथील शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. तसेच इतरही विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे.
Published on: Feb 27, 2023 04:17 PM