मुंबईकरांनो… फ्री वेवरील वाहतूक राहणार बंद! कधी आणि काय आहे कारण?
मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा, फ्री वेवरील वाहतूक रहणार बंद, पण का?
मुंबई : मुंबईकरांनो घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज फ्री वेवरील वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. आज मोदी सीएसएमटी रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यापूर्वी मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्त मुंबई इस्टर्न फ्री वेवरील वाहतूकीत बदल करण्यात आला असून वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. तर फ्री वेवरील वाहतूक ही डीएन रोड, जेजे ब्रिजवर वाहतूक वळवण्यात आली आहे. तर मुंबईकडून वाशीकडे जाणारी वाहतूक आणि वाशीहून मुंबईकडे येणारी फ्री वेवरील वाहतूक दुपारी २. ४५ ते ४.१५ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
Published on: Feb 10, 2023 12:37 PM