…याचा मला अतिशय आनंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माय मराठीत बोलून सर्वांनाच जिंकले

| Updated on: Jan 12, 2024 | 2:40 PM

राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी युवकांशी मोकळेपणाने संवाद साधला.

Follow us on

नाशिक, १२ जानेवारी २०२४ : राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवीसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक महापुरुष घडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सांगितले. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी युवकांशी मोकळेपणाने संवाद साधला तर नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामाने बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. 22 जानेवारीपर्यंत आपण सर्व देशाच्या तीर्थस्थानांची मंदिरांची साफसफाई करू. स्वच्छतेचं अभियान करू. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचं सौभाग्य मिळाल्याचेही मोदी यांनी म्हटले.