पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये येणार
पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल असं म्हणत होकार दिला होता. दरम्यान याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूमध्ये येणार आहेत.
पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते व्हावं. यासाठी पुण्यातील देहू देवस्थानाच्या विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल असं म्हणत होकार दिला होता. दरम्यान याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहू (Dehu) मध्ये येणार आहेत. तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
Published on: May 22, 2022 06:51 PM