ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदी यांचं नाशकात दणक्यात स्वागत, बघा VIDEO
मोदी नाशकात दाखल होताच त्यांचा भव्य रोड शो झाला. जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. नाशिककरांनी मोदींवर फुलांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे नागरिकांनी जय़श्रीराम अशा घोषणा देत नाशिकचा परिसर दणाणून सोडला
नाशिक, १२ जानेवारी २०२४ : यंदा महाराष्ट्रावर २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होत असल्याने गेल्या काही दिवसांपासूनच नाशिक शहरात राजकीय दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नाशकात हजर राहत राष्ट्रीय युवा महोत्सवाची शोभा वाढवली. मोदी नाशकात दाखल होताच त्यांचा भव्य रोड शो झाला. जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. नाशिककरांनी मोदींवर फुलांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे नागरिकांनी जय़श्रीराम अशा घोषणा देत नाशिकचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पेशवाई पथक, लेझीम, नाशिक ढोल ताशांच्या गजरात नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jan 12, 2024 03:23 PM