डायनॅमिक मुख्यमंत्री… पंतप्रधान मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर यावेळी मोदींनी डायनॅमिक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा उल्लेख केला आहे.
मुंबई, ९ फेब्रुवारी, २०२४ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर यावेळी मोदींनी डायनॅमिक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा उल्लेख केला आहे. ‘महाराष्ट्राचे गतिमान आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या तळागाळातील लोकांशी संपर्क आणि मेहनती स्वभावाचा त्यांनी ठसा उमटवला आहे. राज्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे.
Published on: Feb 09, 2024 04:46 PM