Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील सुरक्षेच्या मुद्द्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता

| Updated on: Jan 10, 2022 | 8:06 PM

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर (Punjab Visit) असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. त्यानंतर पंजाब सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मात्र, आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर (Punjab Visit) असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. त्यानंतर पंजाब सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. मात्र, आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 50 पेक्षा अधिक वकिलांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन फोन करण्यात आल्याचं समोर आलंय. हे फोन कॉल्स पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेनं फोनवरुन पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग केल्याची जबाबदारी घेतलीय.

Published on: Jan 10, 2022 08:06 PM