इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसच्या भीषण अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट इथं मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट इथं मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस इंदूरहून अमळनेरकडे निघाली होती. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ‘ज्यांनी प्रियजन गमावले, त्यांच्यासाठी माझ्या सहवेदना आहेत. बचावकार्य सुरू असून स्थानिक अधिकारी अपघातग्रस्तांना शक्य ती मदत करत आहेत,’ असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय. घटना घडली त्यावेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते.
Published on: Jul 18, 2022 01:15 PM