Pritam Munde | ‘कसं वाजवायचं आहे तसं वाजवा’; प्रीतम मुंढे पत्रकारांवर भडकल्या

| Updated on: Nov 23, 2021 | 4:15 PM

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे.

ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावलाय. प्रीतम मुंडे आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.

VIDEO : Pankaja Munde | केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही – पंकजा मुंडे
Ulhasnagar | उल्हासनगरात ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत दागिन्यांची चोरी