Prithviraj Chavan | विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा : पृथ्वीराज चव्हाण
. काहीही बरळायचं आणि त्याला राजश्रय मिळतो आहे. महान स्वातंत्र्यसैनिक यांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तीला गौरवलं जातं हे दुर्दैव आहे. विक्रम गोखले यांनी राजकीय पक्ष जॉइन करावा किंवा कुठल्यातरी पक्षात जावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर सडकून टीक केलीय. तसेच त्यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखळे यांनादेखील लक्ष्य केलं. आम्ही त्या वकव्याचा निषेध केला आहे. काहीही बरळायचं आणि त्याला राजश्रय मिळतो आहे. महान स्वातंत्र्यसैनिक यांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तीला गौरवलं जातं हे दुर्दैव आहे. विक्रम गोखले यांनी राजकीय पक्ष जॉइन करावा किंवा कुठल्यातरी पक्षात जावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.