Prithviraj Chavan on PM| कृषी कायदे रद्द करण्यामागे निवडणुका, सत्ता टिकवणं एवढंच : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Nov 19, 2021 | 11:14 AM

मोदी फक्त निवडणुकीचा जय-परायज डोळ्यापुढे ठेवूनच निर्णय घेतात. झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मोदींच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत म्हणून त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या. आता यूपीमध्ये निवडणुका आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. lत्यावर “देशातील शेतकऱ्यांचा हा मोठा विजय आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात, लोकशाहीत महत्त्वाची घटना म्हणून याची नोंद घ्यावी लागेल. पण, मोदी फक्त निवडणुकीचा जय-परायज डोळ्यापुढे ठेवूनच निर्णय घेतात. झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मोदींच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत म्हणून त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या. आता यूपीमध्ये निवडणुका आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी कायदे रद्द करण्यामागे निवडणुका, सत्ता टिकवणं एवढंच कारण आहे”, असं मत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

VIDEO : Narendra Modi | वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
Bacchu Kadu on PM | फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरणं बदलावी लागतील, बच्चू कडूंचं आवाहन