‘आमच्याकडे बायको नांदत नाही, असे पण लोक येतात’, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 02, 2023 | 7:32 PM

VIDEO | 'आम्ही लोकांचे जनरल फिजीशियन आहोत, आमच्या सर्व प्रकारचे लोक येतात', जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटलांची भाषणात केली फटकेबाजी

जळगाव, २ सप्टेंबर २०२३ | ‘आम्ही वेगवेगळ्या फॅकल्टीचे काम करत असतो, आम्ही लोकांचे जनरल फिजीशियन आहोत, आमच्याकडे सर्व प्रकारचे लोक येतात, आमच्याकडे बायको नांदत नाही, ते पण लोक येतात’, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात भाषणात फटकेबाजी केली. पुढे ते असेही म्हणाले, तुमच्याकडे केवळ हाडाचे आणि मणक्याचे रुग्णं येतात तर आमच्याकडे सर्व प्रकारचे लोक येतात. तुमच्यासारखीच आम्ही सुद्धा दिवसभर ओपिडी सुरू असते हजारो लोक येतात मात्र आम्ही मात्र फ्रेश असतो. जळगाव सुद्धा फार श्रीमंत शहर नाही, जळगाव हे मुंबई आणि नागपूरच्या मधोमध आहे. त्यामुळे गडचिरोलीप्रमाणे जळगाकडेही लक्ष द्या, अशा कोपरखळ्यासुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांना लगावल्या. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मज्जातंतू व मनके यावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया अभियान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

Published on: Sep 02, 2023 07:32 PM
Sanjay Shirsat यांचा विरोधकावर हल्लाबोल; म्हणाले, ‘जोड्यानं या लोकांना मारलं पाहिजे’
‘गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं जालन्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध’, ठाकरे गटाचे आमदाराचा हल्लाबोल