Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची मोठी मालमत्ता ईडीकडून जप्त, काय आहे प्रकरण?

| Updated on: Nov 01, 2023 | 9:20 PM

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त, नरेश गोयल यांच्याकडून ५३८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. ५५० कोटी रूपयांच्या कॅनरा बँक घोटळ्यात ईडीने नरेश गोयल यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. नरेश गोयल यांच्याकडून ५३८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणाने बुधवारी याबाबत माहिती दिली. नरेश गोयल आणि त्यांचे कुटुंबीय आणि कंपनी यांची ५३८ कोटी रुपयांची संपत्ती एका कथित बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपासाचा भाग म्हणून ताब्यात घेण्यात आली आहे, ईडीने जप्त केलेल्या या मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतात असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Nov 01, 2023 09:20 PM