Pravin Darekar | कुरार मेट्रो स्टेशनसाठीच्या कारवाईचा निषेध : प्रवीण दरेकर
कुरारमध्ये झोपडपट्टीवासियांवर करण्यात आलेल्या कारवाईचा दरेकर यांनी निषेध नोंदवला. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण पावसात जुल्मी पद्धतीने कारवाई करणं योग्य नाही.
कुरारमध्ये झोपडपट्टीवासियांवर करण्यात आलेल्या कारवाईचा दरेकर यांनी निषेध नोंदवला. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण पावसात जुल्मी पद्धतीने कारवाई करणं योग्य नाही. जुल्मी कारभाराची पद्धत अयोग्य आहे. लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणं ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असं सांगतानाच फडणवीस सरकारच्या काळातील कामांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरही भाष्य केलं. ईडीच्या कारवाया सुरू आहेत. अनेक नेते अटकेच्या प्रतिक्षेत आहेत, असं विधान त्यांनी केलं आहे.