सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका, विद्यापीठात उमटले पडसाद 

| Updated on: Jun 11, 2023 | 4:04 PM

VIDEO | परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका, युवा सेना आणि युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन

जळगाव : जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षा सुरू असून, परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका मिळाली याचे पडसाद विद्यापीठात उमटले. याप्रकरणी युवा सेना आणि युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांचा झेंडूच्या फुलांचा हार देऊन सत्कार करण्यात आला. चुकांची जबाबदारी स्वीकारून कुलगुरू, रजिस्ट्रार, परीक्षा नियंत्रकांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गेल्या महिन्यापासून विद्यापीठाच्या अंतर्गत व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. यामध्ये सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका मिळाली. दुसरा पेपर झाल्यानंतर ही चूक विद्यापीठाच्या लक्षात आणून देण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही चुकांची मालिका थांबली नसल्याबद्दल असा आरोप युवा सेना व युवक कॉंग्रेसच्या नेत्यांनी रजिस्ट्रार विनोद पाटील यांच्या दालनात आंदोलन केले. कोणाला पास करायचे आहे…? काही प्रश्न या आंदोलकांनी केला.

Published on: Jun 11, 2023 04:04 PM
श्रीकांत शिंदे-भाजप वादावर गिरिश महाजन यांनी दोनच शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘थोडी फार कुजबुज’
मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, बळीराजा सुखावला; राज्यात कुठे बरसल्या पावसाच्या सरी?