दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलक आक्रमक, कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन?
VIDEO | सावंतवाडीतील मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक आक्रमक, बघा कोणत्या मागण्यांसाठी केसरकरांच्या घरासमोर ठिय्या
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरीही त्यांची भरती केली जात नाही. सावंतवाडी येथील दीपक केसरकर हे शिक्षण विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात डी. एड. बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिक्त जागा भरण्यात याव्या, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षणमंत्री हाय हाय. स्थानिकांना रोजगार मिळाल्याच पाहिजे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.