राजधानी मास्कोमध्ये पुतीनविरोधात जोरदार निदर्शने
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानंतर गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेलाय. पुतीन यांनी युक्रेनविरोधातील युद्ध बंद करावे अशी मागणी आता रशियामधूनच होताना दिसत आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानंतर गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेलाय. पुतीन यांनी युक्रेनविरोधातील युद्ध बंद करावे अशी मागणी आता रशियामधूनच होताना दिसत आहे. पुतीन यांच्या या लष्करी कारवाईविरोधात रशियात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यातील अनेक नागरिकांना अटक देखील करण्यात आले आहे. तसेच रशियामध्ये फेसबूक सारख्या सोशल मीडिया साईटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.