महाडमध्ये आज उद्धव ठाकरे यांची ‘शिवगर्जना’, बघा सभास्थळावरून थेट तयारीचा आढावा
VIDEO | महाडच्या चांदे क्रीडांगणात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा, बघा कशी सुरू आहे सभेची तयारी?
रत्नागिरी : आज महाडनगरीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना महाडच्या चांदे या क्रीडांगणातून होताना संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सभेची तयारी चांदे या क्रीडांगणात सुरू होती. या सभेची पूर्ण तयारी आता झालेली आहे. या क्रीडांगणात दहा ते पंधरा हजार खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप या आज ठाकरे गटात हजारो कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश करणार आहेत. अशातच या सभा ठिकाणाचा मार्ग पूर्णतः भगवामय करण्यात आला आहे. तर व्यासपीठ देखील भगवामय करण्यात आला आहे. यावर शिवगर्जना आता जिंकेपर्यंत लढायचं अशा टॅगलाईनचं पोस्टरही स्टेजवर लावण्यात आलेलं आहे. आता फक्त उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांना आणि शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.