Navi Mumbai | नवी मुंबई APMC मार्केटमध्ये तोबा गर्दी, कोरोना कसा रोखणार?

| Updated on: Jul 12, 2021 | 1:45 PM

ज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे.नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये या सूचनांना हरताळ फासला जात आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे.नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये या सूचनांना हरताळ फासला जात आहे. नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी, ग्राहक आणि हमाल न मास्क घालता फिरताना दिसत आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. नवी मुंबईतील घाऊक बाजारात किरकोळ व्यापार सुरु झाला आहे. त्यामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. तसेच आज घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली.

मास्क घाला, लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आव्हान नवी मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. मात्र या सूचनेला पायदळी तुडवले जात आहे.नवी मुंबईतील बाजार आवारात आज जवळपास 700 गाड्यांची भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेतपर्फे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. मात्र ते पण बाजार आवारत कारवाई करताना दिसत नाही.

 

 

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 12 July 2021
Kishori Pednekar | राजकीय लोकांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जातंय, किशोरी पेडणेकर यांचा आरोप