पुण्यातील सासवड- जेजुरी पालखी महामार्गावर रिक्षाच पडली विहिरीत अन्…
VIDEO | पुण्यातील सासवड- जेजुरी पालखी महामार्गावरील खळद बोरावके मळा येथे रात्री भीषण अपघात, विहिरीत रिक्षा पडली असता यातील दोघांना जीवंत बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला सकाळी यश आलं. या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्यांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.
पुणे, २६ सप्टेंबर २०२३ | पुण्यातील सासवड- जेजुरी पालखी महामार्गावर रिक्षा विहिरीत पडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर विहिरीत पडलेल्या रिक्षातून दोघांना जीवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. तर तीन जण अद्याप विहिरीत असल्याची माहिती मिळत आहे. तर विहिरीत पडलेल्या रिक्षातील प्रवाशांचा शोध सुरू आहे. या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्यांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे. पुण्यातील सासवड- जेजुरी पालखी महामार्गावरील खळद बोरावके मळा येथे हा भीषण अपघात घडला आहे. हा भीषण अपघात रात्रीच्या दरम्यान झाला असल्याची प्राथमिक माहिती असून विहिरीत रिक्षा पडली असता यातील दोघांना जीवंत रेस्क्यू टीमने सकाळी काढले आहे. तर तीन जण अजूनही विहिरीत आहेत अशी माहिती सासवड पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचून रेस्क्यू टीमच्या साहाय्याने मृतांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये 1 पुरुष आणि 2 महिलांचा यामध्ये समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.