Pune: पुण्येश्वर मंदिराच्या वादावरुन पतित पावन संघटनेचा आरोप
पुण्यातील पुण्येश्वर तसेच नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिद उभारल्याचा दावा करत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे. यावर पतित पावन संघटनेने टीका करत म्हटले आहे, की या संदर्भातील याचिका ही न्यायप्रविष्ट आहे.
पुणे : पुण्येश्वर मंदिरावरून (Punyeshwar temple) मनसे आणि हिंदू महासंघाने घेतलेली भूमिका हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप पतित पावन संघटनेने (Patit Pavan Sanghatana) केला आहे. पुण्यातील पुण्येश्वर तसेच नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिद उभारल्याचा दावा करत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे. यावर पतित पावन संघटनेने टीका करत म्हटले आहे, की या संदर्भातील याचिका ही न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयात न्याय भेटेल. या संदर्भातील याचिका आधीच दाखल आहे त्यामुळे विषय बाजूला जाऊ नये. तसेच पुण्य ग्रामचा पुण्येश्वर ही पुस्तिकादेखील आम्ही काढली होती, असे पतित पावन संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे स्वप्नील नाईक यांनी हा विषय राजकीय होत असून यावर टीका केली आहे.