Ganapati visarjan 2021 | गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर पुणे, सोलापुरात दुकानं बंद राहणार
आज दिवसभर पुण्यात दुकानं बंद राहणार आहेत. पुण्यातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता बंद राहील. सोलापूरमध्येही दुकानं बंद राहणार आहेत. आज अनंत चतुर्थदशीचा दिवस आहे.
आज दिवसभर पुण्यात दुकानं बंद राहणार आहेत. पुण्यातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता बंद राहील. सोलापूरमध्येही दुकानं बंद राहणार आहेत. आज अनंत चतुर्थदशीचा दिवस आहे. पुण्यात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद राहतील. पुण्यासह सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील दुकानं बंद असल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, आणि शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन मंडपातचं होणार आहे. पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून 7 हजारांचं पोलीस दल शहरात तैनात केलं आहे.