Pune Ambil Odha : आंबिल ओढ्याचा प्रश्न चिघळला, पाडकामादरम्यान नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 24, 2021 | 10:33 AM

पुण्यातील आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

पुणे शहरातील आंबिल ओढ्याच्या जागेचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. (Pune Ambil Odha Dispute) दुसरीकडे पावासाळ्यात अशी कारवाई करायची ठरलं नसताना, या कारवाईचे आदेश कुणी दिले यावरुन आता पुण्यात राजकारण रंगलं आहे. सर्वपक्षीय नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.  (Pune Ambil Odha news controversy Municipal Corporation destroyed construction locals and police clashes )

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई, नागरिक-पोलिसांमध्ये झटापट
Breaking | नाना पटोलेंच्या स्वबळावर काँग्रेसमध्ये नाराजी, पक्षातील काही नेते आणि आमदार नाराज