पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई, नागरिक-पोलिसांमध्ये झटापट

| Updated on: Jun 24, 2021 | 10:25 AM

पुण्यात बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. (Pune Ambil Odha Dispute Live Update)

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.  (Pune Ambil Odha Dispute Live Update)

WTC Final 2021 | विराटसेनेच्या पराभवाची 5 कारणं ज्यामुळे भंगलं विश्व विजेता होण्याचं स्वप्न
Pune Ambil Odha : आंबिल ओढ्याचा प्रश्न चिघळला, पाडकामादरम्यान नेमकं काय घडलं?