पुण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक अवैध टॅक्सी बंद होत नाही तोपर्यंत संपावर
पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जोपर्यंत अवैध टँक्सीज बंद होत नाहीत तोपर्यंत संपवावर ठाम राहणार असल्याचं रिक्षाचालकांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जोपर्यंत अवैध टँक्सीज बंद होत नाहीत तोपर्यंत संपवावर ठाम राहणार असल्याचं रिक्षाचालकांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. रिक्षाचालकांनी काल आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला होता. आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्याकडे त्यांनी अवैध टॅक्सीज आणि बाईक बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी दादा मला वाचवा असे फलक लावून रिक्षाचालकांनी आंदोलन केलं होतं.