VIDEO : Kolhapur | पुणे – बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंदच, पाण्यातून जड वाहनांच्या वाहतुकीची चाचपणी

| Updated on: Jul 26, 2021 | 11:22 AM

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी असल्यानं हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. आताच्या परिस्थिताला देखील महामार्गावर पाणी आहे. यामुळे पुणे - बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंदच आहे.

कोल्हापुरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला. पंचगंगा नदीने गुरुवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर देखील करण्यात आले होते. पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट एक इंचांवर आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 110 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले होते. याचदरम्यान पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी असल्यानं हा महामार्ग बंद करण्यात आला होता. आताच्या परिस्थिताला देखील महामार्गावर पाणी आहे. यामुळे पुणे – बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंदच आहे. पाण्यातून जड वाहनांच्या वाहतुकीची चाचपणी सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या वेदना-आक्रोश आमच्या इतकं कुणी समजू शकणार नाही : संजय राऊत
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 26 July 2021