पुण्यातील अभिनेत्री आर्या घारेने स्मशानभूमीत साजरा केला आपला वाढदिवस
मराठी चित्रपटात बाल भूमीकेसह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या आर्या घारे(Arya Ghare) हिने तिचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा(birthday in a crematorium) केला आहे.
पुणे : मराठी चित्रपटात बाल भूमीकेसह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या आर्या घारे(Arya Ghare) हिने तिचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा(birthday in a crematorium) केला आहे. समाजात रुजत असलेली अंधश्रद्धा आणि त्यात वाहणारी माणसे पाहून तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितले. नागपुरात पाच वर्षीय चिमुरडीला अंधश्रद्धेपायी जीव गमवावा लागला होता. अशा घटना पाहून खूप वाईट वाटतं, त्यामुळंच तरुणांनी पुढे येऊन अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला पाहिजे अस आर्याने म्हटलं आहे.
Published on: Aug 09, 2022 10:34 PM