कलेक्टरिन बाईंचं पद गेलं, आता अटकेची टांगती तलवार, पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी बेड्या
यूपीएससीने दिल्ली पोलिसात पूजाविरोधात गुन्हा दाखल केला होता. वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असूनही ओबीसी नॉन क्रिमिलेयरचा लाभ पूजा खेडकरने घेतला. बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रही पूजाने सादर केली होती. या गुन्हा नंतर अटक होऊ शकते या शक्यतेने केलेला पूजा खेडकरचा अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आलाय
पूजा खेडकर यांचं कलेक्टरपद गेल्यानंतर आता तिच्या अटकेची शक्यता आता वर्तविली जात आहे. कारण अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरकडून करण्यात आलेला अर्ज दिल्ली कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यूपीएससीने दिल्ली पोलिसात पूजाविरोधात गुन्हा दाखल केला होता. वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असूनही ओबीसी नॉन क्रिमिलेयरचा लाभ पूजा खेडकरने घेतला. बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रही पूजाने सादर केली होती. या गुन्हा नंतर अटक होऊ शकते या शक्यतेने केलेला पूजा खेडकरचा अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आलाय. झालेल्या युक्तिवादावेळी आपण जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने मला टार्गेट केलं गेलं असा दावा तिच्याकडून केला गेला. दरम्यान, पूजा खेडकरने केवळ युपीएससी नव्हे तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचं युपीएससीने सांगितले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट