Pune | पुणेकरांसाठी दिलासदायक बातमी, आज कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमचं पुण्यात कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुण्याला देखील बसला होता. पुण्यामध्ये कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढली होती. पुण्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे तब्बल आठ महिन्यानंतर रुग्णांच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्याला 6 फेब्रुवारी 2021 नंतर दिलासा मिळाला आहे.
पुण्यात आज दिवसभरात 112 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, पुण्यात आज दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातही कोरोनाच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे. पुण्यात सध्या 151 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 469 पर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 988 वर पोहोचली आहे. पुण्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 9067 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 493414 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 5986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.