Pune | पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
Pune | पुण्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने व्यापारी वर्ग मोठ्याप्रमाणावर नाराज झाला होता. याविरोधात व्यापाऱ्यांनी निदर्शनेही केली होती. त्यामुळे आता दुकानांची वेळ वाढवून देण्यात येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार रविवारी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या अनेक भागांमधील निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, पुण्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने व्यापारी वर्ग मोठ्याप्रमाणावर नाराज झाला होता. याविरोधात व्यापाऱ्यांनी निदर्शनेही केली होती. त्यामुळे आता दुकानांची वेळ वाढवून देण्यात येणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.