वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण

| Updated on: Mar 09, 2022 | 10:59 AM

या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही

पिंपरी चिंचवड : महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही

अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, काही भागातील बत्ती गुल | Nashik Rain |
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पाऊस